कराची - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शनिवारी सनाने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे तिची १५ वर्षांची कारकीर्दही संपुष्टात आली. सनाने २००९ ते २०१७ या कालावधीत पाकिस्तानकडून १३७ सामन्यांचे नेतृत्व केले.
“सना पाकिस्तान आणि परदेशातील क्रिकेटची महान दूत” - sana mir and icc latest news
आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनु स्वाहने म्हणाले, “सना मीर गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात पाकिस्तानचा चेहरा आहे. सामन्यादरम्यान मैदानावर उत्तम सातत्य दाखविणारी ती जगातील महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. ती पाकिस्तान क्रिकेट संघातील एक उत्कृष्ट नेतृत्व आहे. ती आपल्या देशात आणि बाहेर क्रिकेटची एक महान दूत आहे.”

सना एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारी पाकिस्तानची पहिली महिला क्रिकेटपटू आहे. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती देशातील पहिली महिला क्रिकेटपटू आहे. ऑक्टोबर २०१८मध्ये सनाने गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले होते.