मेलबर्न- ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगचा थरार रंगला असून ही स्पर्धा अनेक चित्रविचित्र घडामोडीने गाजत आहे. मंगळवारी मेलबर्न रेनगेड्स आणि हॉबर्ट हरिकेन्स या संघांत डॉकलॅंड्स स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात हॉर्बटने २० षटकांत १९० धावा करत मेलबर्न संघासमोर विजयासाठी १९१ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना मेलबर्नकडून तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरलेला सॅम हार्पर सहा धावांवर खेळत होता. तेव्हा अचानक एक दुर्घटना घडली आणि त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.
काय घडलं -
हॉर्पर सहा धावांवर खेळ होता. तेव्हा त्याने नॉथन अॅलिसचा एक चेंडू सीमारेषेच्या दिशेने टोलवला आणि पहिल्या धावेसाठी तो जोरात पळाला. हार्परचे लक्ष चेंडूकडे होते. त्यामुळेच त्याला नॉन स्ट्रायकर एंडवर स्टंप्सच्या बाजूला उभा उसलेला नॉथन दिसला नाही. त्याने शेवटच्या क्षणी नॉथनला पाहिले आणि धडक होणार हे लक्षात येताच नॉथनवरून चक्क हार्परने उडी घेतली. त्यामुळे हार्पर जमिनीवर जोरात आदळला.