मोहाली - आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्सचा यांच्यात सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात पंजाबने दिल्लीवर १४ धावांनी विजय मिळवला. पंजाबसाठी खेळणारा इंग्लंडचा युवा क्रिकेटपटू सॅम करनचा या विजयात मोठा वाटा होता.
दिल्लीविरुद्ध हॅटट्रिक नोंदवत सॅम करनने आयपीएलमध्ये रचला इतिहास - inspires
दिल्लीविरुध्द सॅम करनने गोलंदाजीत शानदार कामगिरी करुन ४ विकेट घेत पंजाबच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता
करनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात २.२ षटके टाकताना ११ धावा देत ४ विकेट घेतल्यात. आयपीएलच्या बाराव्या मोसमातील पहिली हॅट्रिक करण्याचा मानही करनने आपल्या नावे केला. तसेच त्याने आयपीएलमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे.
सॅम आयपीएलच्या इतिहासात हॅटट्रिक घेणारा सर्वात कमी वयाचा गोलंदाज ठरला आहे. दिल्लीविरुध्द खेळल्या गेलेल्या या सामन्यात २० वर्षिय करनने फलंदाजी करताना सलामीला येत १० चेंडूत २० धावा केल्या तर गोलंदाजीत शानदार कामगिरी करुन ४ विकेट घेत पंजाबच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. यासाठी त्याला सामनाविराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले