नवी दिल्ली - भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा झालेल्या जवानांच्या मुलांना आपल्या शाळेत क्रिकेटचे धडे देतो आहे. सेहवागने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर चाहत्यांनी सेहवागची तोंडभरून स्तुती केली आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ ला पाकिस्तानी अतिरेक्यांकडून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा भागात झालेल्या या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर अनेक लोक हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयाच्या मदतीला सरसावले होते. यात विरेंद्र सेहवागही होता.
त्याने आपल्या ट्विटर अकांउटवर प्रशिक्षण देतानाचे फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत त्याने हिरो के बेटे..! पूलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या मुलांच्या आयुष्यात योगदान देण्याचा बहुमान मिळाल्याबद्दल मला आनंद आहे, असा आशयाचा मजकूरही पोस्ट केला आहे.