नवी दिल्ली -आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यामुळे फलंदाज महेंद्रसिंह धोनीचे पुनरागमनही लांबणीवर पडले आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेक क्रिकेटपटूंप्रमाणेच धोनीही आपल्या कुटुंबीयासमवेत वेळ घालवत आहे. यापूर्वी, तो मैदान साफ करताना दिसला होता. आता त्याचा नवीन फोटो समोर आला आहे.
...म्हणून साक्षीने धरले धोनीचे पाय! - sakshi on ms dhonis feet news
धोनीची पत्नी साक्षीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये साक्षीन धोनीच्या पायाचा चावा घेताना दिसून येत आहे. ‘एखाद्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी’ असे साक्षीने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सद्या कोरोनाचे सावट आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल विसरा, असे सूचक संकेत दिले आहे. जर आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास धोनीचे भवितव्य अंधारात आहे. आजही धोनीच्या निवृत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. पण धोनीने अद्यापही याविषयी कोणतेही संकेत दिलेले नाही