नवी दिल्ली -भारताचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने १५ ऑगस्टच्या सायंकाळी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. त्याच्या निवृत्तीच्या पोस्टनंतर, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अनेक धोनीप्रेमी चाहते भावनिक झाले. तर, काहींना हा धक्का पचवणे कठीण गेले. धोनीच्या निवृत्तीवर त्याची पत्नी साक्षीनेही भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
''तू जे काही मिळवले आहेस, त्याचा तुला अभिमान असला पाहिजे. क्रिकेटमध्ये आपले सर्वस्व आणि सर्वोत्तम दिल्याबद्दल तुझे अभिनंदन. तू मिळवलेल्या यशाबद्दल आणि तुझ्याबद्दल मला गर्व आहे. मला माहित आहे, की तुझ्यासाठी सर्वकाही असणाऱ्या क्रिकेटला निरोप देताना तू डोळ्यातून अश्रूंना थांबवले असशील. भविष्यातील तुझ्या वाटचालीसाठी शुभेच्छा'', असे साक्षीने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.