महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महेंद्रसिंह धोनीच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन.. साक्षी म्हणते, 'तुझं खेळणं घरी आलंय' - जीएमसी सिएरा

धोनीच्या गॅरेजमध्ये नवीन गाडी आली असून या गाडीचे नाव ग्रँड शेरोकी असे आहे.

नवीन गाडी घेतल्यावर साक्षी धोनीला म्हणते,' तुझं खेळणं घरी आलय'

By

Published : Aug 10, 2019, 4:35 PM IST

नवी दिल्ली -भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचे गाडीप्रेम जगजाहीर आहे. धोनी सध्या काश्मीरमध्ये भारतीय सैन्याबरोबर गस्त घालत आहे. आणि त्यातच, त्याच्या पत्नीने म्हणजेच साक्षीने एक नवीन गाडी घरी आणली आहे.

धोनीच्या गॅरेजमध्ये नवीन गाडी आली असून या गाडीचे नाव ग्रँड शेरोकी असे आहे. या गाडीचा फोटो साक्षीने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंवरुन शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये 'वेलकम होम रेड बिस्ट! शेवटी तुझे खेळणं घरी आले आहे. आणि आम्ही तुला मिस करत आहोत.' असे म्हटले आहे.

या गाडीची किंमत ८० ते ९० लाखांच्या मध्ये आहे. धोनीकडे या आधी अनेक गाड्यांचा संग्रह आहे. चारचाकी गाड्यांमध्ये त्याच्याकडे फरारी ५९९ जीटीओ, हमर एच-२, जीएमसी सिएरा या गाड्या आहेत.

धोनीकडे मोटारबाईक्सचाही चांगला संग्रह आहे. त्यामध्ये कावासाकी निन्जा एच-२, बीएस, कोनफेडेरेट हेलकैट, सुजूकी हायाबूसा आणि नॉर्टन विंटेज या प्रमुख बाईक्स आहेत. विश्वकरंडक स्पर्धा झाल्यानंतर, क्रिकेटमधून दोन महिने विश्रांती घेत धोनीने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details