नवी दिल्ली -कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे भारताचा मास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरने यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन 24 एप्रिलला 47 वर्षांचा होईल.
यंदा सचिनचा वाढदिवस नाही होणार साजरा - sachins birthday this year news
सचिनच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले, की जगभरातील कोरोना आणि देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सचिनने असा निर्णय घेतला आहे. सचिनचा वाढदिवस सहसा भव्य पद्धतीने साजरा केला जातो. अनेक नामांकित सेलिब्रिटी सचिनच्या वाढदिवशी उपस्थित असतात. पण यावेळी परिस्थिती वेगळी असल्या कारणाने सचिनने साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरानाविरूद्धच्या लढाईत सचिनने महत्त्वाचे योगदान दिले आहे. सुरुवातीला त्याने ५० लाखाची मदत दिली होती. त्यानंतर त्याने पाच हजार लोकांच्या रेशनची व्यवस्था केली होती.