नवी दिल्ली -कोरोना व्हायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून क्रीडाक्षेत्रालाही या व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. या व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरही या लढाईत मागे राहिलेला नाही. सचिनने कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
कोरोनाविरूद्धच्या लढाईत आता सचिनही! - सचिन तेंडुलकरची कोरोना लढाईसाठी ५० लाखांची मदत न्यूज
सचिनने या आजारापासून बचाव करण्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि आता तो आर्थिक मदतीसाठी पुढे आला आहे. ‘या लढाईत सरकारचे समर्थन करण्यासाठी सचिनने पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याचे ठरविले आहे’, असे एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी क्रिकेटच्या देवाकडूनही मदत जाहीर
सचिनने या आजारापासून बचाव करण्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि आता तो आर्थिक मदतीसाठी पुढे आला आहे. ‘सचिन जनजागृती करण्यासाठी सतत व्हिडिओ प्रसिद्ध करत आहे. या लढाईत सरकारचे समर्थन करण्यासाठी त्याने पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याचे ठरविले आहे’, असे एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
कोरोना व्हायरसमुळे भारत सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन ठेवला आहे