महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सचिन तेंडुलकर कोरोनाग्रस्त, कुटुंबियांची कोरोना चाचणी निगेटिव्ह - Sachin Tendulkar tests positive for Covid-19

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली.

सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा
सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा

By

Published : Mar 27, 2021, 10:46 AM IST

Updated : Mar 27, 2021, 11:51 AM IST

मुंबई -कोरोना विषाणूच्या साथीने जगाला हादरा दिला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा झाली आहे. सचिनने टि्वट करून यासंदर्भात माहिती दिली.

कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सचिन होमआयसोलशनमध्ये आहे. सचिन तेंडुलकरचे कुटुंब सुरक्षित आहे. सचिन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर संपूर्ण कुटूंबाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. मात्र, त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.

मी सतत चाचण्या करत आलो आहे. तसेच नेहमी कोरोना टाळण्यासाठी सर्व पावले उचलली. तथापि, मी कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे. घरातील इतर सदस्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. मी सध्या होमआयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सूचना पाळत असून मला साथ देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्याचे आभार, असे टि्वट सचिनने केले आहे.

क्रीडापटूंना कोरोनाची लागण

या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला कोरोनाची लागण झाली होती. सुनीलने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली होती. याआधी पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला कोरोनाची बाधा झाली होती. आतापर्यंत अनेक स्टार क्रीडापटूंना कोरोनाची लागण झाली आहे.

Last Updated : Mar 27, 2021, 11:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details