महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'अंजली' पहिलं प्रेम नाही.. व्हॅलेंटाईनदिवशी सचिननं केला उलगडा - सचिन तेंडुलकर व्हॅलेंटाईन पोस्ट न्यूज

सचिनची पत्नी अंजली हे त्याचं पहिलं प्रेम नसून क्रिकेट हे त्याचं पहिलं प्रेम असल्याचं समोर आलं आहे. सचिनने ट्विटरवर या खास दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

sachin tendulkar shares video on valentines day
'अंजली' पहिलं प्रेम नाही.. व्हॅलेंटाईनदिवशी सचिननं केला उलगडा

By

Published : Feb 14, 2020, 3:42 PM IST

मुंबई - १४ फेब्रुवारी हा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' म्हणून जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रेमाच्या या दिवसाने अनेकांना वेड लावलं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आजच्या दिवशी आपल्या प्रेमाप्रती आदरभाव आणि उत्कट प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. भारतीय क्रिकेटचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरलाही या दिवसाची भूरळ पडली असून त्याने आपले प्रेम चाहत्यांसमोर व्यक्त केले आहे.

हेही वाचा -सचिन-लारा वानखेडेवर भिडणार, ७ मार्चला रंगणार सामना

सचिनची पत्नी अंजली हे त्याचं पहिलं प्रेम नसून क्रिकेट हे त्याचं पहिलं प्रेम असल्याचं समोर आलं आहे. सचिनने ट्विटरवर या खास दिवशी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो क्रिकेट खेळत असून त्याने या खेळाला पहिलं प्रेम म्हणून संबोधलं आहे. पाहा सचिननं केलेली पोस्ट -

ABOUT THE AUTHOR

...view details