महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सचिन म्हणतो, मी पुन्हा येईन..! शेअर केला ताडोबा भेटीचा व्हिडिओ

सचिनने सांगितले की, 'ताडोबा अभयारण्यात अविस्मरणीय अनुभव आला. आम्हाला एका वाघीणीसह त्याचे चार बछडे पाहायला मिळाले. ते जवळपास ४५ मिनिटे आमच्या समोर खेळत होते.'

Sachin Tendulkar Shares Video From Visit to Tadoba Andhari Tiger Reserve
सचिन म्हणतो, मी पुन्हा येईन..! शेअर केला ताडोबा भेटीचा व्हिडिओ

By

Published : Feb 4, 2020, 7:29 PM IST

चंद्रपूर- भारताचा मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर काही दिवसांपूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती. या भेटीचा व्हिडिओ त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.

सचिन २४ जानेवरीला पत्नी अंजलीसह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी आला होता. त्याने कोलारा आणि मदनापूर गेटमधून सफारीचा आनंद लुटला. यामध्ये त्याला वाघाचे दर्शन झाले. तेही एक नव्हे तर एकाच वेळी पाच. एक वाघीण आपल्या चार बछड्यांसाह खेळत होती. हा क्षण त्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ त्याने आता शेअर केला आहे.

सचिनने सांगितले की, 'ताडोबा अभयारण्यात अविस्मरणीय अनुभव आला. आम्हाला एका वाघीणीसह त्याचे चार बछडे पाहायला मिळाले. ते जवळपास ४५ मिनिटे आमच्या समोर खेळत होते.'

अभयारण्याचे संरक्षण आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे मला हा अनुभव घेता आला. ताडोबामध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती ही वाघांसाठी भरपूर मेहनत घेत आहे, म्हणूनच पर्यटकांना येथे उत्तम अनुभव मिळु शकतो. हे नियोजन खरचं कौतुकास्पद आहे, असे सांगत सचिनने ताडोबासाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच मी ताडोबात पुन्हा येईन, असेही सचिनने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details