मुंबई - भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने रविवारी दोरी उडी मारतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्याने लोकांना तंदुरूस्त राहण्यासाठी प्रेरित केले. लॉकडाऊनमुळे अनेक क्रिकेटपटू घरी असून सर्वजण आपल्या चाहत्यांशी विविध प्रकारे संवाद साधत आहेत.
"हे लॉकडाउन सर्वांसाठी खूप कठीण आहे परंतु आपण धैर्य गमावू नये. काहीतरी करत राहा आणि स्वत: ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवा", असे सचिननने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.
सचिनने नुकतेच आपल्या पालकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले होते. यासाठी सचिनने इन्स्टाग्रामवर आई-वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला. सचिन या पोस्टमध्ये म्हणाला, "निःस्वार्थ प्रेम, जेव्हा आम्ही मोठे होतो, तेव्हा आमच्या पालकांनी आमची साथ दिली आणि त्यांची काळजी घेतली. माझ्या आयुष्यातही माझ्या पालकांनी मला पाठिंबा दर्शविला, मला मार्ग दाखवला. म्हणूनच. मी आज इतके मोठे स्थान गाठले आहे. "
तो पुढे म्हणाला, "या कठीण काळात आपल्याला पालकांची सर्वात जास्त गरज आहे. त्यांची चांगली काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या पालकांसाठी आवश्यक ते सर्व करावे."
कोरानाविरूद्धच्या लढाईत सचिनने महत्त्वाचे योगदान दिले आहे. सुरुवातीला त्याने 50 लाखाची मदत दिली होती. त्यानंतर त्याने पाच हजार लोकांच्या राशनची व्यवस्था केली होती.