लंडन- भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) गुरुवारी सन्मान केला. आयसीसीने त्यांच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये सचिनचे नाव समाविष्ट केले. हा मान मिळवणारा सचिन भारताचा सहावा खेळाडू ठरला. आयसीसीने सन्मान केल्यानंतर सचिनने ट्विट करत परिवार, मित्र कंपनी तसेच चाहत्याचे आभार मानले.
सचिन आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये.. ट्विट करत व्यक्त केल्या भावना - महान फलंदाज
'आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाल्याने मी खूश आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅथरीन फित्झपॅट्रीक तसेच अॅलन डोनाल्डचेही अभिनंदन.. या सन्मानासाठी मी माझा परिवार, मित्र कंपनी आणि चाहत्याचे मनपूर्वक आभारी आहे', अशा आशयाचे ट्विट सचिनने केले आहे.

गुरुवारी आयसीसीने भारताचा सचिन, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची वेगवान महिला गोलंदाज कॅथरीन फित्झपॅट्रीक यांचे नाव हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केल्याची घोषणा केली. त्यानंतर खूश झालेल्या सचिनने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.