मुंबई -भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचे कौतुक केले आहे. नुकत्याच झालेल्या विंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेत ब्रॉडने 500 बळींचा टप्पा गाठला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने क्रेग ब्रॅथवेटला बाद करून हा कारनामा केला. इंग्लंडने या सामन्यात 269 धावांनी विजय मिळलत मालिका 2-1 अशी जिंकली.
सचिनने ट्विट केले की, "मालिका जिंकल्याबद्दल इंग्लंडचे अभिनंदन. मी पूर्वी म्हटले होते, की त्याच्या पायात एक स्प्रिंग आहे आणि तो एका मिशनवर होता. 500 कसोटी बळी घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. एक मोठी कामगिरी."