मुंबई -क्रिकेटचा देव समजला जाणारा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन चक्क पाण्याने भरलेल्या खेळपट्टीवर क्रिकेट खेळताना दिसतोय.
सचिन खेळतोय चक्क पाण्यात क्रिकेट..पाहा व्हिडिओ - sachin tendulkar latest news
'खेळाच्या प्रेमापोटी तुम्ही सराव करण्यासाठी विविध प्रकार शोधून काढता आणि त्याची मजा घेता', असे सचिनने त्याच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सचिनने याआधी लिंक्डइनवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये सलामीला फलंदाजी करण्यासाठी संघ व्यवस्थापनासमोर मेहनत करावी लागत होती, असे म्हटले होते.

सचिन म्हणाला, '१९९४ मध्ये मी जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध सलामीली फलंदाजी करायला सुरुवात केली तेव्हा विकेट सांभाळून खेळायचे असा पवित्रा सर्वच संघांनी घेतला होता. मात्र मी त्यात थोडा बदल केला. आक्रमक होऊन मी फटकेबाजी करू शकतो असा विचार केला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी ४९ चेंडूत ८२ धावा केल्या होत्या. '