नवी दिल्ली- गुरुपोर्णिेमेच्या दिवसाचे औचित्य साधून भारताचा महान खेळाडू सचिन तेंडूलकरने आपले दिवगंत गुरु रमाकांत आचरेकर यांना मानवंदना दिली. जानेवारीमध्ये रमाकांत आचरेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आचरेकर यांनी भारतीय संघाला सचिनसारखा 'मोहरा' दिला.
'मी घडलो ते आचरेकर सरांमुळेच', सचिनने दिली दिवंगत गुरूंना मानवंदना - सचिन तेंडूलकर
आचरेकर सर, मी आज जो काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच. माझे गुरु आणि मार्गदर्शक आचरेकर सर यांना मनापासून धन्यवाद आणि विनम्र अभिवादन. तसेच त्याने “गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥” हा गुरुची महती सांगणारा श्लोकदेखील ट्विट केला आहे.
सचिनने आज आपल्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो ट्विट केला आहे. त्यामध्ये तो गुरू आचरेकरांसोबत दिसत आहे. त्याने या फोटोसोबत त्याने लिहले आहे की, गुरु हा शिष्याच्या आयुष्यातील अंधःकार आणि अहंकार दूर करतो. आचरेकर सर, मी आज जो काही आहे ते फक्त तुमच्यामुळेच. माझे गुरु आणि मार्गदर्शक आचरेकर सर यांना मनापासून धन्यवाद आणि विनम्र अभिवादन. तसेच त्याने “गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥” हा गुरुची महती सांगणारा श्लोकदेखील ट्विट केला आहे.
सचिननेच प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचे याच वर्षी जानेवारी महिन्यात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यावेळी सचिन खूपच भाविक झाला होता. रमाकांत आचरेकर यांच्यावर शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सचिनसह मुंबईतील अनेक क्रिकेटपटू उपस्थित होते. यावेळी सचिनने आपले गुरू आचरेकर यांच्या पार्थिवाला खांदा दिला होता.