मुंबई - यंदा झालेल्या सांगली आणि कोल्हापूरच्या पूरसंकटाने अनेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या संकटावर मात करण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा फलंदाज अंजिक्य रहाणेनेदेखील मदतीचे आवाहन केले. आता क्रिकेटच्या देवानेदेखील या संकटात सापडलेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
रहाणेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक मराठीमध्ये पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्याने 'मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा' असे म्हटले होते. आता सचिननेही एक ट्विट केले आहे.