लंडन -भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतो. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर तो नेहमी विविध पोस्ट शेअर करत असतो. अशीच एक पोस्ट सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. सचिनने गुरुवारी इंग्लिश म्युझिकल सुपरस्टार मार्क नॉफ्लरची भेट घेतली आणि त्याच्या सोबत एक फोटो काढून तो फोटो ट्विटरवर पोस्ट केला.
क्रिकेटचा देव आणि सुलतान ऑफ स्विंगने केली चाय पे चर्चा, सचिन म्हणाला....
सचिनने गुरुवारी इंग्लिश म्युझिकल सुपरस्टार मार्क नॉफ्लरची भेट घेतली आणि त्याच्या सोबत एक फोटो काढून तो फोटो ट्विटरवर पोस्ट केला.
या पोस्टमध्ये सचिनने एक कॅप्शन लिहिले आहे. सचिन म्हणाला, 'मार्क नॉफ्लरची भेट घेणे ही नेहमी आनंदाची बाब आहे. त्याच्यासोबत चहा - नाश्ता करताना संगीत, खेळ आणि जीवनाबाबतच्या गप्पा मारताना मजा आली. मार्क नॉफ्लर हा उत्तम संगीतकार, माणूस आणि सुलतान ऑफ स्विंग आहे.'
सचिनचा नुकताच आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करणायात आला. सचिनबरोबर दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज क्रिकेटपटू ऍलेन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाची माजी महान महिला क्रिकेटपटू कॅथरिन फिट्झपॅट्रिक यांचाही ऑल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारा सचिन सहावा भारतीय क्रिकेटपटू आहे. यापूर्वी बिशन सिंग बेदी, सुनिल गावस्कर, कपिल देव, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांना हा सन्मान मिळाला आहे.