मुंबई -आपल्या शांत स्वभावामुळे ओळखला जाणारा भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर सध्या एका गोष्टीवरून संतापला आहे. मास्टर ब्लास्टरची मुले म्हणजे सारा आणि अर्जुन यांच्या बनावट अकाऊंटबद्दल त्याने एक ट्विट केले आहे.
हेही वाचा -#HBDRAINA : टी-२० आणि वन-डे वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकणारा एकमेव भारतीय फलंदाज..
सचिनने आपल्या मुलांच्या नावाने असणाऱ्या बनावट ट्विटर अकाऊंटबद्दल ट्विटर इंडियाकडे एक महत्वाची मागणी केली होती. सारा आणि अर्जुन यांच्या अकाऊंटवरून विविध राजकीय पोस्ट करण्यात आल्या. मात्र, या पोस्टशी माझ्या मुलांचा काहीही संबंध नाही, असे सचिनने म्हटले आहे.
'मला हे स्पष्ट करायचे आहे की, माझा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा यांचे ट्विटरवर अकाऊंट नाही. अर्जुनच्या नावाचे अकाऊंट बनावट आहे आणि त्याच्यावरून जाणीवपुर्वक वाद निर्माण होईल, असे ट्विट केले गेले आहे. यासंबंधी कारवाई करावी अशी माझी ट्विटर इंडियाला विनंती आहे', असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.
सचिनच्या या ट्विटची दखल घेत अर्जुनचे ट्विटर अकाऊंट डिलीट करण्यात आले आहे.