हैदराबाद- भारताचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने आपला मित्र विनोद कांबळी याला एक चॅलेंज दिले आहे. सचिनने हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी त्याला एक आठवड्याचा अवधी दिला आहे. हे चॅलेंज जर त्याने आठवड्याभरात पूर्ण केले तर त्याला वाट्टेल ते द्यायला सचिन तयार झाला आहे.
काय आहे सचिनचे चॅलेंज -
सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी काही वर्षांपूर्वी एक गाणे तयार केले होते. त्या गाण्याचे बोल 'क्रिकेटवाली बीट पे' असे होते. या गाण्यात सचिन कोणा-कोणाबरोबर क्रिकेट खेळला आहे, तसेच तो कशाप्रकारे फटके लगावतो, हे दाखवण्यात आले होते. हे गाणं सोनूसोबत सचिननेही गायले आहे. आता हेच गाणं रॅप पद्धतीने गाण्याचं चॅलेंज सचिनने कांबळीला दिले आहे.