मुंबई - भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या दोन माजी फलंदाजांना खूप महत्त्व आहे. या दोघांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन आणि गांगुलीने 176 वेळा भागीदारी रचत 8227 धावा केल्या आहेत. दरम्यान, आयसीसीने या दोघांचा एक एकत्रित फोटो ट्विट केला. या ट्विटवर सचिन-गांगुलीने जबरदस्त उत्तर दिले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपल्या ट्विटरवर या दोघांची आकडेवारी पोस्ट केली आणि लिहिले, "एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली म्हणजे 176 वेळा दमदार भागीदारी, 8227 धावा आणि सरासरी 47.55… इतर कोणत्याही जोडीने एकदिवसीय सामन्यात 6000 चा टप्पा ओलांडला नाही."