नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद यूसुफने अन्य महान फलंदाजांमध्ये भारताच्या सचिन तेंडुलकरला प्रथम स्थान दिले आहे. युसूफला एका चाहत्याने सोशल मीडियावर प्रश्न विचारला होता. तेव्हा त्याने आपल्या आवडत्या फलंदाजांची यादी जाहीर केली.
पाकच्या माजी कर्णधाराने सचिनला दिले पहिले स्थान - mohammad yusuf favourite batsman news
पाकिस्तानकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या युसूफला ब्रायन लारा, पाँटिंग, जॅक कॅलिस, कुमार संगकारा आणि सचिनपैकी कोणताही एक फलंदाज निवडण्यास सांगितले. तेव्हा यूसुफने सचिनला प्राधान्य दिले.

पाकच्या माजी कर्णधाराने सचिनला दिले पहिले स्थान
पाकिस्तानकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या युसूफला ब्रायन लारा, पाँटिंग, जॅक कॅलिस, कुमार संगकारा आणि सचिनपैकी कोणताही एक फलंदाज निवडण्यास सांगितले. तेव्हा यूसुफने सचिनला प्राधान्य दिले. त्यानंतर त्याने लारा, पाँटिंग, कॅलिस आणि संगकारा यांची नावे घेतली.