नवी दिल्ली -सचिन हा माझ्या काळात खेळलेल्या महान क्रिकेटपटूंपैकी एक असल्याची प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने दिली आहे. इन्स्टाग्राम या सोशल माध्यमाद्वारे लाराने आपले मत दिले. या प्रतिक्रियेसोबत लाराने सचिनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
"सचिन हा महान खेळाडूंपैकी एक"
२००४ मध्ये सिडनी येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सचिनच्या २४१ धावांच्या खेळीचा व्हिडिओ लाराने शेअर केला आहे. ही खेळी सचिनच्या कारकीर्दीतील सर्वात शिस्तबद्ध होती, अशा शिस्तबद्धतेने आपणही कोरोनाशी लढू शकतो, असेही लारा म्हणाला.
२००४मध्ये सिडनी येथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सचिनच्या २४१ धावांच्या खेळीचा व्हिडिओ लाराने शेअर केला आहे. ही खेळी सचिनच्या कारकीर्दीतील सर्वात शिस्तबद्ध होती, अशा शिस्तबद्धतेने आपणही कोरोनाशी लढू शकतो, असेही लारा म्हणाला.
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारासारख्या दिग्गज खेळाडूंची उपस्थिती असलेली रोड सेफ्टी विश्व सिरीज महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने रोड सेफ्टी विश्व सिरीजचे आयोजन करण्यात आले होते.