मुंबई -भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर गांगुलीवर शुभेच्छाचा वर्षाव सुरू आहे. थेट पाकिस्तानमधून माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही गांगुलीला 'बधाई हो' म्हटले होते. आता मास्टर ब्लास्टर सचिननेही दादाला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा-इंग्लंडला ३ वेळा विश्वकरंडक जिंकून देणारी अष्टपैलू खेळाडू जेनी गूनने घेतली निवृत्ती
'बीसीसीआय अध्यक्षपदी निवडल्या झाल्याबद्दल दादी तुझे अभिनंदन, मला खात्री आहे की तू नेहमीप्रमाणे भारतीय क्रिकेटची सेवा करत राहशील! पदभार स्वीकारलेल्या नव्या संघास शुभेच्छा', असे सचिनने ट्विटरद्वारे दादाचे अभिनंदन केले आहे. सचिन-गांगुलीच्या जोडीने सलामीली खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्यांनी भारतासाठी १९६ डावात ६,६०९ धावा केल्या असून त्यामध्ये २१ शतके आणि २३ अर्धशतकी भागीदारीचा समावेश आहे.
दरम्यान, सौरव गांगुली एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी अध्यक्ष राहणार आहे. कारण तो मागील ५ वर्षांपासून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार कोणताही अधिकारी सहा वर्ष कोणत्याही पदावर राहू शकतो.