महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IPL: आज दोन 'रॉयल्स'मध्ये झुंज..प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी राजस्थानला विजय अनिवार्य - IPL

राजस्थानला प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय अनिवार्य असून जर तरच्या समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे

आज दोन 'रॉयल्स'मध्ये झुंज

By

Published : Apr 30, 2019, 1:06 PM IST

बंगळुरू -आयपीएलमध्ये आज ४९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघांना या मोसमातील चांगली कामगिरी करता आली नाही. आतापर्यंत या मोसमात राजस्थानने १२ सामने खेळले असून त्यातील ५ सामने जिंकण्यात त्यांना यश आले असून ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे आरसीबीच्या संघाची हालतही काही अशीच आहे. त्यांनी १२ सामने खेळले असून ८ सामन्यात पराभव झाला आहे.


आयपीएलच्या या सत्रात विराट कोहलीच्या आरसीबीचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले आहे. तर राजस्थानला प्लेऑफचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय अनिवार्य असून जर तरच्या समीकरणांवर अवलंबून राहावे लागणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रात्री ८ वाजता खेळवण्यात येणार आहे.


बंगळुरूची फलंदाजीची मदार कोहली-डिव्हिलियर्सलर तर गोलंदाजीची जबाबदारी उमेश यादव आणि यजुर्वेद्र चहल यांच्यावर असेल. दुसरीकडे राजस्थानला विजयासाठी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन याच्यांवर अवलंबून राहावे लागणार आहे


राजस्थान रॉयल्स - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशेन थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग, मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -विराट कोहली (कर्णधार), एबी डी’व्हिलियर्स, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक) हेन्रिच क्लासिन (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, शिम्रॉन हेटमायर, शिवम दुबे, नॅथन कोएल्टर-नाइल, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद सिराज,मोईन अली, कॉलिन डी ग्रॅण्डहोमी, पवन नेगी, टिम साऊदी, आकाशदीप नाथ, मिलिंद कुमार, देवदूत पडिक्कल, गुरकिराट सिंग, प्रयास राय बर्मन, कुलवंत केजरोलिया, नवदीप सैनी, हिम्मत सिंग.

ABOUT THE AUTHOR

...view details