महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

धवनचे विश्वकरंडकातून बाहेर जाणे भारतासाठी नुकसानकारक - रॉस टेलर - new zealand

आम्ही आतापर्यंतचे सामने जिंकून खूश आहोत, मात्र स्पर्धेतील आगामी सामने हे अवघड असणार आहेत - रॉस टेलर

धवनचे विश्वकरंडकातून बाहेर जाणे भारतासाठी नुकसानकारक - रॉस टेलर

By

Published : Jun 13, 2019, 7:16 PM IST

नॉटिंगहॅम -विश्वकरंडकातील १८ व्या भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज रॉस टेलरच्या मते, धवनचे विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर जाणे हे भारतासाठी खूप नुकसानकारक ठरू शकते.

रॉस टेलर

टेलर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की, 'शिखर धवनचे संघातून बाहेर जाणे भारतीय संघासाठी समस्या निर्माण करु शकते. धवन हा एक मोठा खेळाडू असून आयसीसीच्या स्पर्धांमध्ये त्याने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

न्यूझीलंडच्या संघाबाबत बोलताना तो म्हणाला, 'आमच्या संघाने आतापर्यंत ३ सामने खेळले असून या तीन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. आम्ही सामने जिंकून खूश आहोत, मात्र स्पर्धेतील आगामी सामने हे अवघड असणार आहेत.'

विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडच्या संघाने ६ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात शिखरच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला जवळपास संपूर्ण स्पर्धेला मुकावे लागणार आहे. धवनला पर्यायी खेळाडू म्हणून (बॅकअप) ऋषभ पंतला इंग्लंडला बोलवून घेण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details