नवी दिल्ली - भारत आणि वेस्ट इंडीज संघात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना कटकच्या मैदानात उद्या (रविवार) खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकत मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. आता अखेरच्या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघ कटकमध्ये दाखल झाला आहे. यादरम्यान, भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने पत्नी रितीका सजदेह हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
'माझं बलस्थान आणि गेम चेंजर...', हिटमॅन रोहितने पत्नी रितिकाला केलं बर्थ-डे विश - रितिका सजदेहचा वाढदिवस
रोहितने आपल्या ट्विटवर अकाऊंटवर चार फोटो शेअर करत पत्नी रितिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहितने आपल्या ट्विटवर अकाऊंटवर चार फोटो शेअर करत पत्नी रितिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझं बलस्थान आणि गेम चेंजर. मला आणि समायराला तुझा खूप अभिमान वाटतो, असा मॅसेजही रोहितने लिहला आहे.
रोहित शर्माने विशाखापट्टणम येथील दुसऱ्या सामन्यात विंडीजविरुद्ध शानदार शतकं झळकावलं. त्याने या सामन्यात १३८ चेंडूत १५९ धावांची खेळी महत्वपूर्ण केली होती. त्याला या खेळीमुळं सामनावीरच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. दरम्यान, उभय संघातील निर्णायक सामना उद्या (रविवार) खेळवण्यात येणार आहे.
TAGGED:
रितिका सजदेहचा वाढदिवस