मेलबर्न -भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. काही तासांपूर्वीच रोहितने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत आपण भारतीय संघात परतण्यासाठी सज्ज असल्याचे म्हटलं आहे.
सामना संपल्यानंतर व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, 'भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील पाच गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. बुधवारी रोहित शर्मा संघासोबत जोडला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित क्वारंटाइनमध्ये आहे. संघात स्थान देण्यापूर्वी रोहित शर्मासोबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर संघाची निवड करण्यात येईल.'
दरम्यान, रवी शास्त्री यांच्यासह कर्णधार अजिंक्य रहाणे याने देखील रोहित शर्मा भारतीय संघात परतणार असल्याचे संकेत दिले आहेत. रहाणे म्हणाला की, 'रोहितच्या पुनरागमनाबाबत आम्ही उत्साही आहोत. कालच माझे आणि रोहितच बोलणे झाले. तो संघात परतण्यासाठी आतूर आहे.