मुंबई- लॉकडाऊनच्या काळात सर्व खेळाडू आपापल्या घरी कुटूंबियासोबत वेळ घालवत आहेत. अशात अनेक खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. रोहित शर्माही या काळात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. त्याने काही तासांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो मुलगी समायरासोबत खेळताना दिसत आहे.
रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर समायरासोबत खेळतानाचा एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात समायरा आपल्या बाबांसोबत खेळताना हसताना दिसत आहे. रोहितही आपल्या मुलीसोबत खेळताना अगदी लहान झाल्यासारखा दिसत आहे. रोहितने या व्हीडिओ, हे दिवस कधीही परत येणार नाहीयेत.. असे कॅप्शन दिले आहे.
रोहित याआधीही मुलगी समायरासोबत खेळताना अनेकदा पाहायला मिळाले आहे. तो एका सामन्यादरम्यान, दुसऱ्या प्रेक्षक स्टँडमध्ये पत्नी रितिका हिच्यासह बसलेल्या समायराला हातवारे करुन खेळवतानाही पाहायला मिळाले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.