लीड्स - भारतीय सलामीवीर रोहित शर्माने एका विश्वकरंडक स्पर्धेत सर्वात जास्त शतके ठोकण्याचा पराक्रम केला. त्याने आज श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात शतक ठोकले. रोहितचे हे स्पर्धेतील 5 वे शतक ठरले. या शतकासह रोहितने श्रीलंकेच्याच कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
'हिटमॅन' रोहितचा 'विश्वविक्रम'; संगकाराचा विक्रम काढला मोडीत
भारतीय सलामीवीर रोहित शर्माने एका विश्वकरंडक स्पर्धेत सर्वात जास्त शतके ठोकण्याचा पराक्रम केला. त्याने आज श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात शतक ठोकले. रोहितचे हे स्पर्धेतील 5 वे शतक ठरले. या शतकासह रोहितने श्रीलंकेच्याच कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.
श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराने 2015 च्या विश्वकरंडक स्पर्धेत 4 शतके लगावली होती. हा एक विश्वविक्रम होता. तेव्हा रोहित शर्माने बांगलादेशविरुध्द्च्या सामन्यात शतक लगावत संगकाराच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आज पुन्हा 'रन मशिन' रोहितने लंकेच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत शकक ठोकत विश्वविक्रम केला. हा पराक्रम करणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू बनला आहे.
रोहित शर्मा याने विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि आज श्रीलंका अशा 5 संघाविरुद्ध शतक लगावले होते.