लंडन- आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा 'हिटमॅन' रोहित शर्माने 5 शतके ठोकली आहेत. तो सद्या आपल्या कार्यकिर्दमधील सर्वश्रेष्ठ फार्ममध्ये आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र या यशाचे मागे 2011 सालचा 'मालिकावीर' युवराज असल्याची कबुली रोहित शर्माने दिली आहे. युवराजने केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी धावा करु शकलो. असे रोहितने श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यानंतर आयोजित प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना सांगितले.
विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी युवराज आणि मी एकत्रित मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल खेळलो. या आयपीएलमध्ये माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. तेव्हा युवराजने मला तु धावा काढू शकतोस असा विश्वास दिला. कदाचित युवराज आगामी विश्वकरंडक स्पर्धेविषयी मला सांगत होता. त्याच्या या विश्वासामुळे मी धावा जमवू शकलो. असे रोहित शर्माने सांगितले.