महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हिटम‌ॅन रोहितच्या 'विरुष्का'ला अनोख्या शुभेच्छा - अनुष्का शर्मा न्यूज

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी गोंडस मुलीला जन्म दिला. भारतीय संघाचा हिटमॅन फलंदाज रोहित शर्माने विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.

rohit-sharma-congratulates-virat-kohli-and-anushka-sharma-on-the-birth-of-their-first-child
हिटम‌ॅन रोहितच्या 'विरुष्का'ला अनोख्या शुभेच्छा

By

Published : Jan 12, 2021, 9:13 AM IST

मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अनुष्काने सोमवारी दुपारी गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी विराटने ट्विट करत दिली. यानंतर विराटसह अनुष्कावर सेलिब्रिटी व चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. भारतीय संघाचा हिटमॅन फलंदाज रोहित शर्माने देखील विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहितने सोमवारी ट्विट करत विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहे. यात त्याने, ही अद्भूत भावना आहे. दोघांनाही शुभेच्छा, गॉड ब्लेस, असे म्हटलं आहे. दरम्यान, रोहितचे हे ट्विट सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितच्या आधी सायना नेहवाल, इरफान पठाण यांनीसुद्धा ट्विटरवर विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.

विराटने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत दिली माहिती-

आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचे हे सौभाग्य आहे की, आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असे आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचे सांगितले होते. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे.

हेही वाचा -IND VS AUS : दुखापतग्रस्त हनुमा विहारी चौथ्या कसोटीतून बाहेर

हेही वाचा -IND VS AUS : टीम इंडियाला आणखी एक धक्का, 'हा' खेळाडू देखील चौथ्या कसोटीला मुकला

ABOUT THE AUTHOR

...view details