महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहित शर्माला मिळाली आनंदाची बातमी..वाचा ट्विट - rohit sharma latest news

"रियल माद्रिदच्या पदरात आणखी एक शीर्षक. रियल माद्रिद या कठीण काळात नक्कीच एक संघ म्हणून उदयास आला आहे. अभिनंदन. या वर्षाच्या शेवटी एक चांगली बातमी मिळाली", असे रोहितने ट्विटरवर म्हटले.

Rohit sharma congratulates real madrid on winning La Liga tiltle
रोहित शर्माला मिळाली आनंदाची बातमी..वाचा ट्विट

By

Published : Jul 17, 2020, 6:54 PM IST

मुंबई- स्पॅनिश लीग ला-लीगाचे 34 वे विजेतेपद जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने फुटबॉल क्लब रियल माद्रिदचे अभिनंदन केले. रियल माद्रिदने विला रियालचा 2-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

"रियल माद्रिदच्या पदरात आणखी एक शीर्षक. रियल माद्रिद या कठीण काळात नक्कीच एक संघ म्हणून उदयास आला आहे. अभिनंदन. या वर्षाच्या शेवटी एक चांगली बातमी मिळाली", असे रोहितने ट्विटरवर म्हटले.

माद्रिदचे हे सलग तिसरे ला-लीगा जेतेपद आहे. करीम बेंझेमाच्या दुहेरी गोलमुळे माद्रिदने हा विजय नोंदवला. त्याने 29 व्या मिनिटाला पहिला, तर 77 व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. विला रियालकडून विसेंटा इबोराने 83 व्या मिनिटाला एकमेव गोल केला. प्रशिक्षक झिदानच्या मार्गदर्शनाखाली माद्रिदने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले.

कोरानामुळे सर्व प्रकारचे उपक्रम थांबले आहेत. दरम्यान काही देशांमधील फुटबॉल लीगला हिरवा कंदील मिळाला आहे. त्याचवेळी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मालिकेसह क्रिकेटचेही पुनरागमन झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details