महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रोहितने केली 'चहल-रॉक'ची तुलना, म्हणाला... - युजवेंद्र चहल लेटेस्ट न्यूज

रोहितने डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार रॉक आणि चहलची तुलना केली आहे. त्याने या दोघांचा 'टॅटू' असलेला एक शर्टलेस फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोवर अनेकांनी आपल्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

rohit sharma compares wwe superstar rock and yuzvendra chahal
रोहितने केली 'चहल-रॉक'ची तुलना, म्हणाला...

By

Published : Jan 21, 2020, 8:57 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर अनेकवेळा चर्चेत असतो. 'वॉटरबॉय' म्हणून गाजलेला चहलचा फोटो आजही अनेक मीम्समध्ये वापरला जातो. आता चहल अजून एका आगळ्यावेगळ्या तुलनेने चर्चेत आला आहे. आणि ही तुलना भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने केली आहे. या फोटोने नेटकऱ्यांची मनेही जिंकली आहेत.

चहलने दिलेली प्रतिक्रिया

हेही वाचा -क्रीडाविषयक समितीमधून सचिन आणि आनंदला केंद्रसरकारने काढले बाहेर!

रोहितने डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार रॉक आणि चहलची तुलना केली आहे. त्याने या दोघांचा 'टॅटू' असलेला एक शर्टलेस फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोवर अनेकांनी आपल्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका भारताने जिंकली मात्र, हेडलाईन्समध्ये दुसराच कोणीतरी आहे',असे रोहितने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

तर, चहलनेही या फोटोला ईमोजीने प्रत्युत्तर दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details