महाराष्ट्र

maharashtra

जाणून घ्या, 'हिटमॅन' शर्माने द्विशतकासह केलेले 'हे' मोठे विक्रम

By

Published : Oct 20, 2019, 6:12 PM IST

रोहितने २५५ चेंडूंचा सामना करत २१२ धावा केल्या, त्यामध्ये २८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. रोहित हा दुहेरी शतक झळकावणारा भारताचा २४ वा फलंदाज ठरला आहे.

जाणून घ्या, 'हिटमॅन' शर्माने द्विशतकासह केलेले 'हे' मोठे विक्रम

रांची -भारताचा सलामीवीर रोहित शर्माची सध्या स्वप्नवत वाटचाल सुरू आहे. कसोटीत स्थान मिळालेल्या रोहितने आपला फॉर्म कायम राखत रांची कसोटीत द्विशतक झळकावले आणि अनेक दिग्गजांचा विक्रम मोडित काढला.

हेही वाचा -रोहितच्या दमदार प्रदर्शनाने, 'या' दोन खेळाडूंची कसोटी कारकिर्द धोक्यात

रोहितने २५५ चेंडूंचा सामना करत २१२ धावा केल्या, त्यामध्ये २८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. रोहित हा दुहेरी शतक झळकावणारा भारताचा २४ वा फलंदाज ठरला आहे. या मालिकेत रोहितने आतापर्यंत ४ डावात १३२.२५ च्या सरासरीने ५२९ धावा केल्या आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक आणि टी -२० मध्ये शतक ठोकणारा रोहित हा भारताचा एकमेव फलंदाज आहे.

मालिकेत सलामीवीर म्हणून ३ शतके झळकावणारा रोहित भारताचा दुसरा फलंदाज आहे. कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. या मालिकेत त्याने आतापर्यंत १९ षटकार ठोकले आहेत.

रोहित शर्मा

घरच्या मैदानावर खेळताना कमीतकमी १० सामन्यांत रोहितची सरासरी सर्वाधिक राहिली आहे. या विक्रमामध्ये त्याने दिग्गज डॉन ब्रॅडमन यांना पछाडले आहे. ब्रॅडमन यांची सरासरी ९८.२२ ची असून रोहितची सरासरी ९९.८४ ची राहिली आहे.

या मालिकेत आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात दुहेरी शतके झाली आहेत. पहिल्या कसोटीत मयंक अग्रवालने २१५ तर, दुसर्‍या कसोटीत कोहलीने नाबाद २४४ धावा आणि आता रोहितने २१२ धावा केल्या आहेत. यापूर्वी, १९५५-५६ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध अशी कामगिरी भारताने केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details