मुंबई- भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात ५६ धावांची खेळी केली. रोहितच्या खेळीने भारताला सामन्यात विजय मिळाला नसली तरी त्याने अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. रोहितने सर्वात वेगवान ८ हजार धावा काढताना माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत २०० डाव खेळताना ८ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात वेगवान ८ हजार धावा करण्याचा विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावे आहे. विराटने अवघ्या १७५ डावांत ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर, दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलिअर्स असून त्याने १८२ डावांत ८ हजार धावा केल्या आहेत. रोहित शर्मा आणि सौरव गांगुली यांनी प्रत्येकी २०० डावात ८ हजार धावा केल्या आहेत.