महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताच रोहित करणार मोठा विक्रम - रोहित शर्माचा नवीन विक्रम

७ नोव्हेंबरला होणाऱ्या या टी-२० सामन्यात रोहित शर्मा १०० वा सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू असणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा खेळाडू ठरेल. याआधी, पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट (१११) सामने खेळले आहेत.

बांगलादेशविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताच रोहित करणार मोठा विक्रम

By

Published : Nov 6, 2019, 7:00 PM IST

मुंबई -बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पराभव स्वीकारावा लागलेल्या भारताला राजकोटमध्ये वचपा काढण्याची नामी संधी असणार आहे. या संधीसोबतच भारताचा कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालणार आहे.

हेही वाचा -नेमबाजपट्टू मनू भाकरने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पटकावले सुवर्णपदक

७ नोव्हेंबरला होणाऱ्या या टी-२० सामन्यात रोहित शर्मा १०० वा सामना खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू असणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा खेळाडू ठरेल. याआधी, पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट (१११) सामने खेळले आहेत.

रोहितसोबत पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीनेसुद्धा ९९ सामने खेळले आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये रोहितनंतर धोनीचा क्रमांक लागतो. धोनीने ९८ तर, सुरेश रैनाने ७८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहितने ९९ टी-२० सामन्यांत २४५२ धावा केल्या असून तो या प्रकारात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details