दुबई - आज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. गतविजेत्या मुंबईला सामोरे जाण्यासाठी बंगळुरू सज्ज झाला असला तरी, त्यांच्यासमोर कामगिरीतील सातत्य हे मोठे आव्हान असणार आहे. तर, दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने पहिल्या लढतीतील पराभवानंतर शानदार पुनरागमन केले. संघाने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध शानदार विजय मिळवला आहे.
आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहितला मोठा विक्रम खुणावतो आहे. विराटसेनेविरुद्ध १० धावा जमवल्यास रोहित आयपीएलमध्ये आपल्या ५००० धावा पूर्ण करणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैना यांचा या विक्रमात आधीच समावेश झाला आहे.