ज्यूरिख -स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर 2020च्या उर्वरित हंगामाला मुकणार आहे. उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केल्यामुळे तो यंदाचा उर्वरित हंगाम खेळू शकणार नाही. फेडररने बुधवारी ही माहिती दिली.
2020च्या उर्वरित हंगामाला रॉजर फेडरर मुकणार...वाचा कारण - roger federer injury news
फेडरर म्हणाला. "माझ्या प्रिय मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही सुरक्षित असाल. काही आठवड्यांपूर्वी मला थोडा त्रास झाला होता. मला माझ्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आता 2017च्या हंगामाप्रमाणे गोष्टी घडत आहेत. मी माझ्या सर्वोत्कृष्ट खेळासाठी लागणारा वेळ घेत आहे. मला माझ्या चाहत्यांची आठवण येईल. पण मी तुम्हाला 2021 च्या हंगामात भेटण्यासाठी तयार असेन."

यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडररने शेवटचा सामना खेळला होता. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याला सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचकडून पराभव पत्करावा लागला. 1998च्या पदार्पणानंतर फेडरर प्रथमच कोर्टापासून दूर असणार आहे.