विशाखापट्टणम - टीम इंडिया आणि आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या या सामन्यात वृद्धिमान साहाचे भारतीय संघात पुनरागमन झाले असून, रिषभ पंतचा पत्ता कट झाला आहे.
हेही वाचा -...म्हणून श्रीशांतला धोनीचा 'चेन्नई सुपरकिंग्स' संघ आवडत नाही
निराशाजनक कामगिरीमुळे पंतचा समावेश संघात होणार का याविषयी सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र, या कसोटी मालिकेत साहाच यष्टीरक्षण करणार असल्याचे कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. शिवाय, फिरकीपटू रविश्चंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे खेळाडूही संघात असतील असे कोहलीने म्हटले आहे.
दुखापतीमुळे, वृद्धिमान साहा संघाबाहेर होता. त्याने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अखेरची कसोटी मालिका खेळली होती. त्यामुळे तब्बल २२ महिन्यानंतर साहा पुनरागमन करणार आहे.
दोन्ही संघातील कसोटी मालिकेचे वेळापत्रक -
- पहिला सामना - २ ते ६ ऑक्टोबर - विशाखापट्टणम.
- दुसरा सामना - १० ते १४ ऑक्टोबर - पुणे.
- तिसरा सामना - १९ ते २३ ऑक्टोबर - रांची.
भारतीय संघ -मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा.
दक्षिण आफ्रिकेचा संघ -फाफ डू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गार, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.