नवी दिल्ली -ऋषभ पंतला महेंद्रसिंह धोनीचा उत्तराधिकारी मानले जात होते. तसे त्याने सुरुवातीला चांगली कामगिरी करुन देखील दाखवली. पण त्याला आपल्या कामगिरीतील सातत्य राखता आले नाही. यामुळे भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात केएल राहुलला संधी देण्यात आली आणि कसोटी क्रिकेटमध्ये वृद्धिमान साहाला पसंती देण्यात आली. आता पंतविषयी, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने त्याचे मत व्यक्त केले आहे. त्याने, पंतला पुढचा धोनी करण्याचा विचार देखील करू नये. धोनीसारखा कोणी होऊ शकत नाही, असे म्हटलं आहे.
गंभीर म्हणाला, धोनी कोणीही होऊ शकत नाही. सर्व प्रथम आपल्याला पंतला धोनी म्हणणे बंद केले पाहिजे. माध्यमांनी असे बोलू नये. मीडिया जितके याबद्दल बोलते तितके पंत त्याबद्दल विचार करतो. तो कधीच धोनी होऊ शकत नाही. त्याला ऋषभ पंतच रहावे लागेल.
यंदाच्या हंगामात ऋषभ पंतची फलंदाजी ही अतिशय खराब झाली असून गौतम गंभीरच्या मते ऋषभला आपल्या यष्टीरक्षणावर अधिक काम करण्याची गरज आहे. यष्ट्यांमागे पंतची कामगिरी अगदीच सुमार होती, असे मत गंभीरने व्यक्त केले.
अशी आहे पंतची IPL च्या तेराव्या हंगामातील कामगिरी -