महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पाँटिंगला जुन्या खेळीची झाली आठवण, शेअर केला बॅटचा फोटो - bat photo by Ricky ponting news

पाँटिगने या बॅटचे दोन फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. “माझ्या अर्ध्या कारकिर्दीनंतर मी माझ्या बॅटच्या हँडलरवर ठोकलेल्या शतकाची नोंद करायचो. ही बॅट इंग्लंडविरूद्ध ठोकलेल्या शतकाची नोंद आहे. या खेळीमुळे मला अभिमान वाटतो”, असे पाँटिंगने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Ricky ponting remembers old innings shared bat photo
पाँटिंगला जुन्या खेळीची झाली आठवण, शेअर केला बॅटचा फोटो

By

Published : Apr 24, 2020, 4:56 PM IST

Updated : Apr 24, 2020, 6:12 PM IST

मेलबर्न -ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ट्विटरवर एका बॅटचा फोटो शेअर केला आहे. या बॅटने पाँटिंगने २००५ साली अ‌ॅशेस मालिकेत इंग्लंडविरूद्ध १५६ धावा ठोकल्या होत्या. या खेळीला त्याने अभिमानास्पद म्हटले आहे.

पाँटिगने या बॅटचे दोन फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत. “माझ्या अर्ध्या कारकिर्दीनंतर मी माझ्या बॅटच्या हँडलरवर ठोकलेल्या शतकाची नोंद करायचो. ही बॅट इंग्लंडविरूद्ध ठोकलेल्या शतकाची नोंद आहे. या खेळीमुळे मला अभिमान वाटतो”, असे पाँटिंगने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

४२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने नऊ विकेट्सवर ३७१ धावा केल्या होत्या. इंग्लंडविरूद्धचा हा सामना अनिर्णीत राहिला होता.

Last Updated : Apr 24, 2020, 6:12 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details