मेलबर्न -ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक वापरल्या गेलेल्या बॅटचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. ''या बॅटमुळे मी पाच आंतरराष्ट्रीय शतके केली. त्यापैकी चार दक्षिण आफ्रिकेविरुध्द केली आहेत. एससीजीतील माझ्या शंभराव्या कसोटीत मी 120 आणि 143 धावांची खेळी केली होती'', असे पाँटिंगने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पाँटिंगने पुढे लिहिले, "याशिवाय वँडर्स येथे खेळल्या गेलेल्या 444 विरुद्ध 438 धावांच्या एकदिवसीय सामन्यात मी 164 धावा केल्या होत्या. या बॅटचा मी जेवढा वापर करू शकत होतो तेवढा मी केला. आता ही बॅट खराब झाली आहे.''