महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयसीसीच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या कल्पनेला पाँटिंगचा विरोध - रिकी पाँटिंग ४ दिवसीय कसोटी न्यूज

कसोटीतील अशा बदलांच्या बाजूने नसल्याचेही पाँटिंगने सांगितले. आयसीसी पुढील फ्युचर टूर्स प्रोग्राममध्ये (एफटीपी) चार दिवसीय कसोटी सामने आणण्याचा विचार करत आहे. त्यामुळे व्यावसायिकतेसाठी  मर्यादिक क्रिकेटमध्ये अधिक वेळ मिळू शकेल.

ricky ponting also objected to the four-day Test match after Virat
आयसीसीच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या कल्पनेला पाँटिंगचा विरोध

By

Published : Jan 6, 2020, 10:58 AM IST

सिडनी -ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज आणि दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने आयसीसीच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या कल्पनेला विरोध दर्शवला आहे. कसोटीतील अशा बदलांच्या बाजूने नसल्याचेही त्याने सांगितले. आयसीसी पुढील फ्युचर टूर्स प्रोग्राममध्ये (एफटीपी) चार दिवसीय कसोटी सामने आणण्याचा विचार करत आहे. त्यामुळे व्यावसायिकतेसाठी मर्यादिक क्रिकेटमध्ये अधिक वेळ मिळू शकेल.

हेही वाचा -भाजप खासदार गौतम गंभीरने जेएनयू हल्ल्याचा केला तीव्र निषेध, कठोर शिक्षेची मागणी

'मी या कल्पनेविरूद्ध आहे. मात्र, यामागचे मुख्य कारण काय आहे हे ज्याच्या लक्षात आले त्यांच्याकडून मला जाणून घ्यायचे आहे. चार दिवसीय कसोटी सामन्यात आणखी सामने निर्णय न घेता तसेच राहतील. मला माहित आहे, की गेल्या दोन वर्षातील कसोटी क्रिकेटमध्ये आम्ही चार दिवसांत बरेच सामने आटोपलेले पाहिले आहेत. परंतु, गेल्या दशकात किती कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत हे माझ्या लक्षात आले. सर्व सामने चार दिवस राहिले असते तर आणखी कसोटी सामने अनिर्णित राहिले असते', असे पाँटिंग म्हणाला.

पाँटिंगपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर, फिरकीपटू नॅथन लायन आणि ग्लेन मॅकग्रा यांनी चार दिवसांच्या कसोटी सामन्याबद्दल मतभेद व्यक्त केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details