महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पीसीबीकडून उमर अकमलवर तीन वर्षांची बंदी,  निवृत्त न्यायाधीश करणार सुनावणी - umar akmal ban hearing news

पीसीबीने लादलेल्या तीन वर्षांच्या बंदीविरूद्ध अकमलने अपील केले होते. अकमलने बाबर अवान यांच्या हाताखालील वकिलाची नेमणूक केली असून अवान हे पंतप्रधान आणि संसदीय कामकाज सल्लागार होते. 17 मार्च रोजी पीसीबीच्या कलम 2.4.4 च्या दोन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप अकमलवर आहे.

Retired judge will hear umar akmals appeal against ban
निवृत्त न्यायाधीश करणार अकमलवरील बंदीची सुनावणी

By

Published : May 31, 2020, 7:19 PM IST

लाहोर - पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश (निवृत्त) फकीर मोहम्मद खोखर यांना क्रिकेटपटू उमर अकमलवरील बंदीच्या सुनावणीसाठी स्वतंत्र न्यायाधीश म्हणून निवडले गेले आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) ही माहिती दिली. पीसीबीने लादलेल्या तीन वर्षांच्या बंदीविरूद्ध अकमलने अपील केले होते. भ्रष्टाचार संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पीसीबीने उमरवर बंदी घातली आहे.

अकमलने बाबर अवान यांच्या हाताखालील वकिलाची नेमणूक केली असून अवान हे पंतप्रधान आणि संसदीय कामकाज सल्लागार होते.

17 मार्च रोजी पीसीबीच्या कलम 2.4.4 च्या दोन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप अकमलवर आहे. अकमलवरील बंदी क्रिकेटच्या सर्व स्वरूपात लागू असेल. अकमलला फिक्सिंगच्या प्रस्तावाची मंडळाला माहिती न दिल्याबद्दल ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकमलवरील बंदी 20 फेब्रुवारी 2020 पासून लागू झाली.

पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) पाचवी आवृत्ती सुरू होण्यापूर्वी अकमलला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेअंतर्गत एखाद्या खेळाडूला फिक्सिंगसाठी काही प्रस्ताव आल्यास ते विनाविलंब मंडळाला कळवावे असे बंधनकारक आहे. तसे न केल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details