सचिन, विराटसह क्रीडा जगतातील खेळाडूंनी देशवासियांना दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा - सचिन तेंडुलकर न्यूज
देशभरात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोना सावटामुळे प्रजासत्ताक दिनी होणारे कार्यक्रम कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहेत.
मुंबई - देशभरात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोना सावटामुळे प्रजासत्ताक दिनी होणारे कार्यक्रम कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळीच ट्विट करत देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशवासियांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! जय हिंद... असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, सर्वस्तरातून शुभेच्छाचा वर्षाव होत असून क्रीडा विश्वातील खेळाडूंनी देखील देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.