मुंबई- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा विश्व ठप्प झालं आहे. अनेक स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशात सर्व खेळाडू आपापल्या घरात कुटुंबीयासोबत घरी आहेत. पण, नेहमी मैदानावर लाखो चाहत्यांच्या गराड्यात असणाऱ्या खेळाडूंवर सध्या घरातली सर्व कामे करायची वेळ आलेली आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्याची बायको आयेशा ही आरशासमोर मेकअप करताना दिसत आहे. तर शिखर हा कपडे आणि घरातले कमोड साफ करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊडला 'जब से हुई है शादी, आफत गले पडी है, गाणे वाजत आहे.
दरम्यान, याआधीही शिखरने सोशल मीडियावर आपले गमतीशीर व्हिडिओ पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या मुलांसोबत डोळ्यांवर पट्टी बांधून पिलो-फाईटचा व्हिडिओ शेअर केला होता.