महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'कोपा डेल रे' स्पर्धेत रिअल विरुद्ध बार्सिलोना यांच्यात 'एल क्लासिको' उपांत्य सामना

उपांत्यफेरीत रिअलसमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोनाचे कडवे आव्हान असणार आहे. परतीच्या लढतीत गिरोनाविरुद्ध झालेल्या सामन्यात रिअलने चांगली कामगिरी करताना यजमान गिरोनाला ३-१ ने पराभूत केले. करिम बेंझेमाने २ गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

अजिंक्य आहे आमुचा

By

Published : Feb 1, 2019, 11:29 PM IST

गिरोना-'कोपा डेल रे'स्पर्धेत रिअल माद्रिद संघाने चांगली कामगिरी करताना उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.उपांत्यफेरीत रिअलसमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोनाचे कडवे आव्हान असणार आहे.परतीच्या लढतीत गिरोनाविरुद्ध झालेल्या सामन्यात रिअलने चांगली कामगिरी करताना यजमान गिरोनाला ३-१ ने पराभूत केले. करिम बेंझेमाने २ गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

रिअल माद्रिदने २०१४ साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.पहिल्या लढतीत घरच्या मैदानावर रिअलने ४-२ असा विजय मिळवला होता.परतीच्या लढतीतही रिअलने चांगली कामगिरी करताना ३-१ असा विजय मिळवत ७-३ सरासरीसह स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.रिअलच्या करिम बेंझेमाने २७ मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले.तर,सत्र समाप्तीच्या काही मिनिटांपूर्वी त्याने दुसरा गोल करत संघाला २-० आघाडी मिळवून दिली.दुसऱ्या सत्रातही रिअलकडून मार्कस लोरेंटेने गोल करताना संघाला ३-१ असा विजय मिळवून दिला. गिरोनाकडून पेड्रो पोर्रोने एकमेव गोल ७१ व्या मिनिटाला केला.

३१ वर्षीय बेंझेमाने रिअलकडून आतापर्यंत ४४६ सामन्यात खेळताना २०९ गोल केले आहेत.त्याने ला लीगमध्ये १४६,चॅम्पियन्स लीगमध्ये ४७ आणि कोपा डेले रे स्पर्धेत २० गोल केले आहेत. बेंझेमाने रिअलकडून सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत सहावे स्थान पटकावले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details