मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालवधी शिल्लक राहिला आहे. अशात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगळुरूच्या आणखी एक खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा खेळाडू डॅनियल सॅम्सला कोरोनाची लागण झाली आहे. याची पृष्टी आरसीबीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. आरसीबीने या विषयावरून एक ट्विट केले आहे. यात त्यांनी, डॅनियल सॅम्स चेन्नईत ३ एप्रिल रोजी दाखल झाला. तेव्हा त्याची चाचणी करण्याती आली, यात तो निगेटिव्ह आला. दुसऱ्या चाचणी ७ एप्रिलला करण्यात आली, यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे, असे म्हटलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मेडिकल टीम सतत डॅनियलच्या संपर्कात आहे. तसेच त्याच्या प्रकृतीवर नजर ठेवली जात आहे. यादरम्यान, बीसीसीआय नियमाचे पालन केले जात आहे, असे देखील आरसीबीने म्हटलं आहे.